रिती रिवाज

तुळशी-वृंदावन

तुळस ही महाऔषधी वनस्पती. मानवी आरोग्याला अनेक प्रकारे सहाय्य करणारी ही वनस्पती. तिची दोन तीन पाने जरी नियमित रोज सेवन केल्यास सर्दी, खोकला, ताप असे अनेक लहानमोठे आजार दूर पळतात. तिच्यामुळे वातावरण शुद्ध राहायला मदत होते. तिच्या पानांचा रस औषधी असतोच पण तिचे खोड, फुले-मंजिऱ्या या मूळ एवढेच नव्हे तर तिच्या मुळांजवळची मातीदेखील औषधी असते. विंचू, गांधील माशी किंवा अशाच प्रकारच्या अनेक किटक दंशावर तुळशीच्या मुळाजवळील मातीचा लेप दिल्यास दाह कमी होतो. हे तर अनेकांना ठाऊकही नसते. ज्वर फार वाढल्यास, अंगाचा दाह कमी होतो. हे तर अनेकांना ठाऊकही नसते. ज्वर फार वाढल्यास, अंगाचा दाह होत असल्यास, या मातीचा लेप कपाळावर लावतात. पूर्वी खेडोपाडी डॉक्टर नव्हते. त्यामुळे सारा भर घरगुती औषधांवर असे. अशी ही बहुगुणी वनस्पती आजीच्या बटव्यातील अनेक औषधांबरोबर अनुपान (सहाय्यक) म्हुणून उपयोगी जपणूक व्हावी हे क्रमप्राप्त ठरले. ‘अॅन अॅपल अ डे, किप डॉक्टर अवे’, या साहेबी संकल्पनेपेक्षा हा विचार फार प्राचीन काळापासून आपल्याकडे घराघरात रुजला होता. त्यामुळेच प्रत्येक दारी ‘तुळशी वृंदावन’ ही संकल्पना अस्तित्वात आली असावी.

त्याला पाठबळ लाभावे म्हणून तुळस श्रीकृष्णाला आवडते; विठ्ठलाच्या तुळशीच्या माळा-हार, अशा विविध कथा जोडल्या गेल्या असाव्यात. सकाळी स्नानानंतर तुळशी तिला केवळ देवत्व अर्पण करून तिचे दैवी गुण आपण विसरत चाललो आहोत. ‘तुळस’ केवळ देवत्व अर्पण करून तिचे दैवी गुण आपण विसरत चाललो आहोत. ‘तुळस’ केवळ पूजेतील साहित्यातली एक अंग बनली. कृष्ण आणि विठ्ठलाला मोठमोठाले तुळशी-हार वाहण्यात आम्ही धन्य मानू लागलो. कृष्णाच्या तुळशी प्रेमाच्या कथा आपण कौतुकाने ऐकतो. दिवाळीच्या सणाची सांगता तुळशी विवाहाने होऊ लागली. मोठ्या समारंभपूर्वक तुळशीचा विवाह घरच्या यजमानाशी होते. याचे खरे कारण वेगळेच आहे. ही महाबहुगुणी वनस्पती घरोघरी असावी. ती परसात कुठेतरी वाढून दुर्लक्षित राहू नये म्हणून तुळशी वृंदावन जरी दारी असले तरी तिच्या संरक्षणाची जबाबदारी पती या नात्याने घरच्या यजमानावर सोपवली जाते. तिची नीट देखभाल व्हावी, रोजच्या रोज तिला पाणी घातले जावे म्हणून किती शहाणपणाने ही प्रथा आपल्या पूर्वजांनी घालून दिली, नाही का? मात्र ती आपल्या देवघरात गेल्याने विष्णू सहस्त्र-नामासारख्या कर्मकांडात तुळशी-पत्रांच्या राशी देवापुढे पडू लागल्या. तीच तुळशी-पत्रे दुसऱ्या दिवशीच्या निर्माल्यात, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जमा होऊ लागली. दुर्दैवाने,त्यातील एक तरी पान कुणाच्या पोटात जावे असे मात्र आम्हास वाटत नाही. आता पाश्चात्यांनी ‘हर्बल’ औषधामध्ये तिचा उपयोग केल्याने तीच औषधे मोठाल्या किमती देऊन आम्ही विकत घेतो. पण तुळस आणि तुळशी-वृंदावनाचा मात्र आम्हास विसर पडतो.