बाल कविता / कविता

आगळा वेगळा देश

आगळा होता एक देश
तिथे होता वेगळाच वेश
नोकर राहत साहेबासारखे
मालक मात्र साधे सुधे
शाळेत जात माणसे मोठी
छोट्यांना मात्र रोजच सुटी
बाबा लिहितात बाराखडी
आई मारते दोरीवरून उडी
आजी आजोबा खेळत रंगली
सारी मुले देवळात गेली
देवळात होती मोठी आरती
मुलांनी लावल्या शंभर वाती
शंभर वातींचा पडला प्रकाश
उजळून गेले सारे आकाश
आकाशातून चांदोबा आला
म्हणे, मला खाऊ काय आणला?