बाल कविता / कविता

करू सुगंधित सारे

चला, करू सुगंधित सारे...
जीवन चाले यंत्रामागुती
सारे जगती यंत्र होऊनी
नसे विसावा कुणास कसला
चला तोडूनी पाश, उठा रे...१
एक एक लाउनी रोपटे
छान साजिरे हे गोमटे
हर दाराशी एक तरी रे
फुलवू सुगंधित फुल रे ...२
चला लाऊ या तरू वेलींना
गुलाब चंपा जाई-जुईना
फुलतील बागा फुला- फुलांनी
सुगंधित पहा वाहती वारे...३
करू सुशोभित नगर आपुले
आसमंत करू हिरवे हिरवे
फुलवू बागा मनामनातून
खुलतील हसतील सारे....४
करू साफ रे रस्ते वाटा
कुणी न दावू दिमाख खोटा
हे एक होऊनि करावयांचे
चला, तर कुदळ फावडे घ्या रे...५
चला, करू सुगंधित सारे ....