बाल कविता / कविता

कोल्होबाची शाळा

कोल्होबाने काढली शाळा
प्राणी पक्षी झाले गोळा
कोल्हा म्हणे मीच मास्तर
नाचू लागल छोट तित्तर

मोर आला नटून थटून
कावला बसला मागे रुसून
हरीण आले पळत पळत
सिह निघाला दबकत दबकत

माकडोबाने काढता खोडी
वाघोबाने पसरले भोकाड
ससोबाने समजूत घालता
वाघोबा हसला सात माड

हत्ती बसला जागा अडवून
चिमणाताई गेली चिडून
मैना गाते सुंदर गाणी
बगला सारखा पितो पाणी

गाढव झाल वर्गप्रमुख
घेई सर्वांवर तोंड-सुख
गोंधळ काही आवरेना
कोल्हयाची शाळा चालेना

अभ्यासाचे वाजले बारा
गणिताचे झाले तीन तेरा
कुणास कळेना कुणाची भाषा
राहिला कोल्हा मारीत माशा !..