बाल कविता / कविता

खूप खूप पतंग

पतंग पतंग
खूप खूप पतंग
दादा आला ताई आली
काका आले काकी आल्या
सारे जमले गच्चीवर
लाल पतंग दादाचा
हिरवा पतंग ताईचा
माझा पतंग जांभळा
मेळा जमला रंगांचा
एकेक पतंग उडाले
उंच ढगाला टेकले
रंग बेरंगी पतंगांनी
आभाळ सारे भरले
फुलपाखरे जणू उडणारी
आभाळाला भिडणारी
काटा काटी काका करती
पतंग सारे मजेत डुलती
काटला पतंग दूर गेला
साऱ्यांनीमग गलका केला
आरडा ओरडून घसा दमला
आईने तिळाचा लाडू दिला
तिळगुळ घ्या गोडगोड बोला...