बाल कविता / कविता

चला ,चला तर

उधळू रंग मजेचे सारे
चला, तर एक होऊ या रे
दिन आले हे खेळायाचे
हसू बागडू उडावयाचे
नकोच पाटी ,नकोच दप्तर
नको, नको ती शाळा शिस्त
जाऊ चला रे , दूर सहलीला
कडे कपारी पहावयाला
निसर्गसवे रमून जाऊ
सवे पाखरा गाणी गाऊ
बसू कुणी रंग घेउनी
छंद कलेमधी जाऊ रमुनी
विश्व रंगवू मनातले ते
हर रंगाशी आपुले नाते
एक ,एक क्षण रे मोलाचा
उगा कुठे ना दवडायाचा
सुटी घालवू मजेत सारी
स्मृती राहतील परीं अंतरी
चला, तर एक तर होऊया रे...