बाल कविता / कविता

चिऊ काऊ

येरे यारे काऊ चिऊ
आपण गोड गाणे गाऊ
काऊ म्हणे काव काव
तुझा माझा एकच गाव
दाणे टिपत चिऊ येई
चिव चिव म्हणत गाण गाई
चिऊ काऊ छान छान
बाळ घेई हलकेच तान..