चिऊताई चिऊ ग
जोडीन गाणी गाऊ ग
दाने घालीन मुठभर
नाच तुझा अंगणभर...१
कावळे दादा जवळी ये
भिऊ नकोस पोळी घे
कावकाव तुझी झाडावर
नजर मात्र या खाऊवर...२
हिरवे हिरवे पोपटराव
डाळिंब मिरची पेरूवर ताव
विठू विठू कसे काय
खाली डोके वरती पाय...३
डुलत डुलत बदक चाले
पाण्यावरती नाव डोले
बाळ धरू जाता बळे
छुन छुन वाजती घुंगुरवाळे...