बाल कविता / कविता

आज एक मज्जा झाली

आज काय मज्जा झाली
आमची चिनू मोठी झाली
काय डोक्यावर शिंग आली?
खोल खोल की मूळ गेली?
अहो परीसारखे पंख आले
पाठीवरती चमकू लागले
झग्याला टिकल्या चमचम छान
चिनू दिसते गोरी गोरीपान
उंच उडाली गिरक्या घेत
म्हणाली मला तारे हवेत
ढगाच्या आड सुंदर बाग
त्यात उतरली मजा पहात
वेलीवरती चांदण्याची फुल
तिथे खेळती छान छान मुल
झाडांना मोठाली लॉली पॉप
चॉकलेत गोळ्या बाप रे बाप
टॉफी बिस्कीट हव ते घेऊ
त्यावर थोडं आईस्क्रीम खाऊ
कलिंगडाची लाल लाल फोड
चिनूच तोंड झाल गोडच गोड