बाल कविता / कविता

आजोबांचा चष्मा

आजोबांचा चष्मा
माकडाला मिळाला
आरशात पाहून
ऐटीत जाऊन
खुर्चीत बसले
उलटा पेपर
वाचायला लागले
मग स्वारी
झाडावर चढली
वादाच्या फांदीवर
शाळा काढली
माकडेच माकडे
झाली गोळा
ची ची करीत
गोंधळ घातला
पारंबीवरून एक
खाली उतरे
दुसरे उलटे फांदीला लटके
एका जागेवर कुणीच बसेना
चष्म्यावाल्या माकडाची शाळा चालेना...