आभाळातली म्हातारी
जात फिरवून कंटाळली
ढग पांघरून झोपली
पावसाची रिमझिम थांबली
सूर्य बाप्पा रागावला
लाले लाल तापला
सुकून गेल्या झाडेवेली
पशु पाखर तहानलेली
शेतकरी पण घाबरले
सुकले सारे नदी नाले
देवापुढे द्या भाकली
मग म्हातारी हळूच हसली
चरखा फिरवी गरा गरा
ढगात भरला खरा वारा
बिजली करते चमचमाट
सुरु झाली झिमझिमाट..