बाल कविता / कविता

एक कळी

एक कळी रुसून बसली
पानामागे दडून राहिली
तिच्याकडे बघून सारी
फुले मात्र गोड हसली
कळी म्हणाली फुलणार नाही
वाऱ्यावरती डुलणार नाही
सकाळ होता फुलं फुलली
वाऱ्यावरती डोलू लागली
रंग-बिरंगी फुलपाखरे
त्यांचा भोवती उडू लागली
पानामागे एकटीच कळी
आता मनातून खट्टू झाली
सूर्य बाप्पा वर आला
कळीला पाहून हसू लागला
त्याला पाहून लाजली कळी
हलत, डुलत फुलून आली...