बाल कविता / कविता

एक होता फुगा

एक होता फुगा
तो बसला उगा
रागावला तो खोटा
आवाज आला मोठ्ठा
एक होता फुगा
त्याचा लाल लाल झगा
त्यात हवा भरली धूम
त्याची ढेरी भरली टूम
एक होता फुगा
लांब लांब उभा
वाकवली त्याची मान
माकड बघा झाले छान