बाल कविता / कविता

एक होता बोकोबा

एक होत बोकोबा
होता मोठा रागोबा
त्याला एकदा मिळाला खवा
तो म्हणे मलाच हवा
सासोबाची गोष्टच वेगळी
भिवून स्वारी बिळात शिरली
ढग विजेची कडकडाट
ऐकून त्याची गाळण उडाली
फांदीवर माकड लटकले
चिऊताईने त्याला हटकले
दात दाखवून चीची करी
चिऊ म्हणे हम्माच बरी...