बाल कविता / कविता

एक होता मासा

एक होय मासा
अगदी छोटासा
सोनेरी रंगाचा
सगळ्यांना हवासा
कल्ले धरून गच्च
मासा उंच उडाला
कल्ले पसरून लांबवर
तरंगायला लागला
वरून खाली अन
खालून वर वर
फिरत गेला
सुळूक सुळकन
मग हलविताच
ढग त्याने
मोती गळाले
खळक- खळ्कन
मोत्यांची माळांची
केली घसरगुंडी
आनंदाने सागरात
मारली टूणकण बुडी