एक होती आजी
राणीवरती राजी
केळी आणते ताजी
चॉकलेट आणि खाजी
थंडगार आईस्क्रीम
चाम्चाने भरविते
खाऊ-बाऊ मागता
हटट सारे पुरविते
बंड्या बबड्या म्हणते
आणि गालच ओढते
रडू नको सांगते
खूप लाड पुरविते
आई एवढी मोठी होईन
पैसा घेऊन भुर्र जाईन
आजीसाठी खाऊ आणीन
आबा मामाला वाटून देईन ...