अल्प परिचय
प्राथमिक, माध्यमिक व उच्चकला अशा तीन स्तरांवर कलाध्यापक म्हणून ३८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. आता निवृत्त
विविध कला-स्पर्धा व शासकीय कला परीक्षांसाठी परीक्षक तसेच समालोचक ( Moderator ) म्हणून काम केले आहे.
“चित्रिय” काव्यसंग्रह प्रकाशित / सामान्यांचा ध्यानयोग
भाव कलाविश्व, चित्रगंध, भारतीय शिक्षण, मुंबई सकाळ, नवशक्ती, सामना, गंधाली, ज्ञान सावली, कोकण-शक्ती, रोहन, कथामाला, साहित्य संगम, डहाणू वार्ताहार इ. नियतकालिकांमधून विविध विषयांवरील लेख, कविता व कथा प्रकाशित.
नाट्य, छायाचित्रण इ. इतर छंद.
सामाजिक कार्याची आवड, अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी संबंध व प्रत्यक्ष सहभाग.
बाल-चित्रकलेवर पालक, शिक्षक, प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी यांच्यापुढे प्रात्यक्षिकांसह व्याख्याने तसेच लेखन.
बालविकास – शिक्षण व संस्कार या ग्रंथात बालकलेवरील लेख समाविष्ट.
कथामाला मासिक – सहसंपादक व सजावट.
बालकलेचे अंतरंग या बालकलेचा परिचय देणाऱ्या पुस्तकाचे लेखन हाती घेतले आहे.
बालचित्रकलेवर दूरदर्शनवर एक तासाची मुलाखत.