आपला भारत देश मुख्यतः कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे बहुतेक रूढी, धार्मिक
आचार, सण आणि दैनदिन व्यवहार हे शेती जीवनाशी निगडीत असणे साहजिकच आहे.
निसर्गाविषयी कृतज्ञतेची भावना, पर्यावरण विषयक सुचना, आरोग्य विषयक दक्षता आणि
सांस्कृतिक देवाण घेवाण यावरच या रूढी आधारलेल्या असत. त्यांचेच सामाजिक
परंपरेमध्ये रुपांतर झालेले दिसून येते. मात्र यातील काही प्रथा किंवा रूढी
जनमानसावर एवढ्या घट्ट बसल्या की, कल बदलला, विज्ञान युग अवतरले तरीही त्या रूढी
परंपरेने पाळण्यात अभिमान वा अट्टाहास बाळगताना दिसतात. कालानुरूप त्यात बदल
करण्याचे अथवा त्या मोडीत काढण्याचे धारिष्ट्य कुणी करीत नही. किंबहुना त्या रूढी
पाळण्यामागे काही अंधश्रद्धांच समाजमनावर रुजलेल्या रुजलेल्या दिसतात. त्यांना
धार्मिक कर्मकांडांचे स्वरूप येऊन त्यांना ईश्वरी संकल्पनांशी संबंध जोडलेला
दिसतो. कदाचित काही चांगल्या रूढी समाजात बिंबवण्यासाठी आणि काही अनिष्ट गोष्टी
टाळण्यात म्हणून त्यांना ईश्वरी संकल्पनांची जोड आपल्या पूर्वजांनी दिली असावी. वस्तविक
या सामाजिक रूढी आणि धार्मिक नीती यांचा काहीही संबंध नसतो. ईश्वराच्या भीतीपोटी
का होईना समाज या गोष्टी स्वीकारेल असा आपल्या दृष्ट्या पूर्वजांचा दृशिकोन असावा.
पण या रूढी म्हणजेच धर्म असा चुकीचा अर्थ समाजातून बिंबलेला दिसतो. या रूढी
मोडल्या तर आपला धर्म बुडेल अशी भीती वायास्कांकडून अथवा पुरोहितांकडून बोलून
दाखवली जाते. यामुळे त्या त्या रूढीमागचा खरा अथवा वैज्ञानिक अर्थ मात्र
दुर्लक्षिला जातो. सुशिक्षितही या परंपरेकडे धार्मिक कर्मकांडांच्याच भावलेले
पाहतात, तेव्हा मात्र त्याचे आश्चर्य वाताल्यावाचून राहात नही. अशाच काही
रूढी-परंपरांचा परिचय करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.